Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

प्रवचन – का व कशासाठी?

प्रवचन - का व कशासाठी?

प्रवचन म्हणजे काय? तर प्रवचन म्हणजे विचारांचे विश्लेषण, कोणत्याही एका विषयावर भाषण, प्रत्यक्ष व वैयक्तिकपणे समोरच्याला दिलेलं प्रामाणिक मत, प्रेरणादायक भाषण परंतु आपल्या डोळ्यासमोर येत ते म्हणजे कोणी एका प्रवचनकाराने त्यांच्या सभेत दिलेलं भाषण ज्यात सर्व वयोगटातील पण मुख्यतः वयोवृद्ध वयोगट ज्यांना वेळ घालविण्यासाठी जप-तप व्यतिरिक्त असलेला पर्याय. कारण पूर्वीच्या काळात प्रवचनाचा अर्थ हाच होता आणि आत्ताही काहींना तोच वाटतो हि वस्तुस्थिती.

नमस्कार वाचक मित्रांनो. आज मी थोडा वादग्रस्त विषय घेऊन येत आहे. काहींना आवडेल, काही वाचून नावं ठेवतील, काही विषय बघून पुढचा लेख वाचणारही नाहीत, पण मी इथे कोणत्याही प्रवचनकारांना खोटे ठरविण्यासाठी वा प्रवचनाविरुद्ध भडक विधानं तुमच्यासमोर मांडणार नाही. तुम्हाला खरंच ह्या प्रवचनाची गरज आहे? बघा हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून आणि पुढे आमच्या लेखामध्ये उत्तर मिळते का ते पहा.

प्रवचन म्हणजे काय? तर प्रवचन म्हणजे विचारांचे विश्लेषण, कोणत्याही एका विषयावर भाषण, प्रत्यक्ष व वैयक्तिकपणे समोरच्याला दिलेलं प्रामाणिक मत, प्रेरणादायक भाषण परंतु आपल्या डोळ्यासमोर येत ते म्हणजे कोणी एका प्रवचनकाराने त्यांच्या सभेत दिलेलं भाषण ज्यात सर्व वयोगटातील पण मुख्यतः वयोवृद्ध वयोगट ज्यांना वेळ घालविण्यासाठी जप-तप व्यतिरिक्त असलेला पर्याय. कारण पूर्वीच्या काळात प्रवचनाचा अर्थ हाच होता आणि आत्ताही काहींना तोच वाटतो हि वस्तुस्थिती. आता तर हि प्रवचनं काही प्रवचनकारांकडून फारच मनोरंजनकारकरीत्या दिली जातात, त्यात काही स्पष्ट उल्लेख, विनोदी किस्से, गाणी आणि अन्य काही माध्यमांतून सादर करण्यावर भर दिला जातो आणि त्यात स्पर्धाही व्हायला लागल्या आहेत. हा मुद्दा थोडा वेगळा आहे जिथे आपण जाणार नाही. लेखात पुढे आपण पाहणार आहोत कि प्रवचन का व कशासाठी?
प्रथम आपण पाहू कि प्रवचन का? प्रवचन काय, त्याची व्याख्या काय हे आपण वर पाहिलंच, पण ते का? प्रवचन जसं वर नमूद केल्याप्रमाणे एक भाषण म्हणून आपण ऐकतो, ज्याचे विषय आपण आपल्या आवडी-निवडीप्रमाणे वा गरजेप्रमाणे निवडतो. वय कोणतेही असो, कोणाच्याही आयुष्यात असा वेळ येतो अथवा किस्से घडतात जिथे आपल्याला अपयश, नैराश्य येतं किंवा एकाकी वाटणं अश्या गोष्टींमुळे नाकारात्मकतेला सामोरे जावे लागते. इथे आपल्याला गरज असते एका आधाराची आणि इथे प्रवचन एका आधाराचे काम करते. प्रवचन देणाऱ्याचे वय नाही तर त्याने दिलेलं मत व मांडलेले विचार हे खूप महत्वाचे आहे.

आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वाळू ते म्हणजे कशासाठी? वर म्हंटल्याप्रमाणे प्रवचन म्हणजे आधार आणि आधाराची व्याख्या नव्याने सांगायला नको, पण तरीही सांगतो. प्रवचन हा एक मानसिक आधार आहे जो आपल्याला आलेल्या नाकारात्मकतेतून बाहेर पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतं.आता तर हि प्रवचनं बऱ्याच विषयांवर उपलब्ध आहेत आणि त्यांना पाहण्याचे, वाचण्याचे वा ऐकण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

थोडक्यात काय तर स्थलांतर करून आपले प्रश्न पूर्णपणे सुटत नाही वा प्रगती होत नाही, तर आपण काही सुंदर गोष्टींना मुकत असतो व फक्त धावपळ पदरी पडते. हा मुद्दा फार थोडक्यात आवरता घेतला पण आशय समजून घ्यावा हि विनंती आणि पुढच्या मुद्द्याकडे वळूया.

प्रवचनाची गरज सर्वाना आहे वा लागते, त्याला दुमत नाही कारण तो एक आधार आहे.

आता ह्या लेखामध्ये मी आता थोडीशी गम्मत आणि विषयाला वेगळेच वळण देणार आहे. आपण वर वाचले तेही माझेच मत आहे आणि पुढे जे सांगणार आहे तेही माझेच मत असणार आहे, फक्त तुम्हाला कुठल्या मतांबरोबर पुढे जायला आवडेल हे तुम्हाला ठरवायचे आहे. आणि हो, तुमच्याकडे फक्त ह्या दोनच मतांचा पर्याय आहे असं नाही, तुम्हाला तुमचं मत निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्या सर्वांना कधी ना कधी नाकारात्मकतेचा सामना करावा लागला असेलच, तर त्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात हे आठवून पहा. तुम्हाला आधाराची गरज लागली असेलच, तो सर्वांसाठी वेगळा असेल.तुम्ही प्रेरणादायी प्रवचनं ऐकली व वाचली असतील.

लेखाच्या शेवटच्या वळणावर मी एक महत्वाचा खुलासा करत आहे. तुम्हाला सांगू का, खरे प्रवचनकार कोण? ते म्हणजे “आपले आई-वडील”. बसला ना धक्का, काय बोलता नाही? म्हणजे पटले तर तुम्हाला. मला वाटलेले आणि पटलेले प्रवचनकार म्हणजे माझे आई-वडील. बघा ना, तुम्हाला लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत सर्व अडचणीतून आणि वर विस्तारीतपणे मांडलेल्या म्हणजेच नाकारात्मकतेतून हळुवारपणे बाहेर काढण्यात आपल्यासाठी सर्वप्रथम धावून आलेले आपले प्रवचनकार हेच होते ना. बाहेरून कोणी आले होते का, किंवा तुम्ही बाहेरच्यांना कोणाला आवाज दिला का तर नाही. आवाज दिला तो ह्यांना, आपले आई-वडील. कारणही तसेच आहे, त्यांनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेला चढ-उतार आणि त्यातून काढलेला यशस्वी मार्ग, एवढा अनुभव त्यांच्या पाठीशी असतो. स्वतःची व परिवाराची जबाबदारी सांभाळून केलेली तारेवरची कसरत. एवढे खंबीर, अनुभवी, आणि यशस्वी प्रवचनकार आपल्याला लाभले असतांना आपण बाहेरच्या मंडळींकडे का वळतो हे मोठे कोडे आहे. मलाही ते माहित होते पण हा विषय हाताळतांना उलगडला आणि तुमच्या समोर मांडावासा वाटला.

शेवटी एवढंच सांगेन माझे म्हणणे म्हणून नाही तर स्वतःच्या मनाशी विचार करा आणि ठरवा. आयुष्यात चढ-उतार येतं असतात आणि पुढे हि येतीलच, परंतु त्याचा उपाय आपल्या स्वतःकडे असताना आपण तो बाहेर शोधत असतो हे चुकीचे आहे. आपले आई-वडील हेच सर्वश्रेष्ठ प्रवचनकार आहेत असे मला वाटते आणि आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आलेल्या प्रत्येक अडचणींना यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतो.

तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा, आणि जर खरंच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *