Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक – एक उत्तम पर्याय

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक - एक उत्तम पर्याय

होय, शेअर मार्केट हा एक उत्तम पर्याय आहे आणि त्यात गुंतवणूक करणं सर्वांना सहज शक्य आहे. आपणां सर्वांना शेअर मार्केट काय हे माहितच आहे परंतु त्यात प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यास कचरता, याच कारण एकच - भीती आणि हि भीती दूर करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या लेखांमधून करत आहोत. शेअर मार्केटला तुम्ही पूर्णवेळ म्हणजे नोकरी वा व्यवसाय म्हणून किंवा एक पर्यायी तसेच अतिरिक्त उत्पन्न म्हणूनही पाहू शकता.

होय, शेअर मार्केट हा एक उत्तम पर्याय आहे आणि त्यात गुंतवणूक करणं सर्वांना सहज शक्य आहे. आपणां सर्वांना शेअर मार्केट काय हे माहितच आहे परंतु त्यात प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यास कचरता, याच कारण एकच – भीती आणि हि भीती दूर करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या लेखांमधून करत आहोत. शेअर मार्केटला तुम्ही पूर्णवेळ म्हणजे नोकरी वा व्यवसाय म्हणून किंवा एक पर्यायी तसेच अतिरिक्त उत्पन्न म्हणूनही पाहू शकता. हे कसे करता येईल त्यासाठीच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता
भीती का व कशाची? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून उलगडतील व तुमची भीती कमी होऊन या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी आशा आम्ही बाळगतो
शेअर मार्केट हा आपल्या प्रत्येक गुंतवणुकीच्या मागचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे जर का आपण शेअर मार्केट मध्ये थेट गुंतवणूक केल्यास त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल, हे लक्षात घ्या. सर्वांना वाटणारी भीती हि एक तर ऐकिवात, अपुरा अभ्यास अथवा पुरेसा वेळ न दिल्याचा परिणाम असू शकतो.शेअर मार्केट मध्ये १००% निकाल येणं जरी शक्य नसलं तरी ते कमी ठेवणं आपल्या हातात आहे, हे आमच्या अभ्यासाच्या निकालांवरून आम्ही ठामपणे सांगू इच्छितो.

शेअर मार्केट मध्ये यशस्वी वाटचाल करण्यासाठी आपणांस हवे – योग्य तांत्रिक शिक्षण, पुरेसा वेळ, पैसे, मानसिक तयारी आणि प्रबळ इच्छाशक्ती. ह्या सर्वांचा मेळ जमवता आला तर तुम्ही शेअर मार्केट मधून यशस्वीपणे पैसे कमावू शकता अथवा करिअर सुद्धा बनवू शकता. या लेखामध्ये पुढे आम्ही याबद्दल सविस्तरपणे आपली बाजू मांडणार आ

सध्याची परिस्थिती पाहता (कोविड १९ – कोरोना), यामुळे लोकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या, व्यवसायांवर गदा आली आहे आणि या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. हि झाली एक वस्तुस्थिती. अशी अनंत कारणं आहेत. आपल्याकडे अनेक होतकरू तरुण तरुणी आहेत परंतु ह्या स्पर्धात्मक युगामध्ये सर्वांना योग्य ती संधी मिळणं कठीण होत चाललं आहे व ते संधीच्या प्रतीक्षेत स्वतःचा आत्मविश्वास हरवून बसतात. अशा व अन्य सर्वांसाठी “शेअर मार्केट” हा एक पर्यायी आणि परिपक्व व्यवसाय म्हणून पुढे आला आहे. पर्यायी हा शब्द वापरण्यामागचा हेतू हा आहे कि ह्या पर्यायांची संधी गृहिणी, नोकरदार वर्ग, विद्यार्थी वर्ग, आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी हि उपलब्ध आहे.आणि ना शिक्षणाची अट. फक्त योग्य तांत्रिक शिक्षण, मानसिक तयारी आणि जिद्द, यांच्या जोरावर तुम्ही यशस्वी होऊ शकता.

शेअर मार्केट चा पर्याय का निवडावा? जसे कि वर सांगितल्याप्रमाणे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या आणि व्यवसाय ह्या कोरोनाकाळात प्रभावित झाले आहेत आणि आर्थिक दुर्बलता आली आहे. कोरोनाच नाही तर अशी बरीच कारणं असतात कि ज्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो त्याला शेअर मार्केट एक प्रभावी उपाय म्हणून बघितले जाऊ शकते कारण यातून तुम्हाला हवे तसे उत्पन्न घेऊ शकता आणि बाहेर कुठे हि न जाता. अजून एक महत्वाचे कारण म्हणजे ह्या कोरोना काळात जिथे सर्वकाही टाळेबंदीमुळे बंद होते त्या काळातही शेअर मार्केटचा व्यवहार चालू होता आणि ज्याचा फायदा शेअर मार्केट व्यावसायिकांना झाला. शेअर मार्केट ची परिस्थिती काही असो, जर तुमचे ज्ञान आणि अचूकता उत्तम असेल तर तुम्ही कुठल्याही कठीण काळात शेअर मार्केटमधून कमाई करू शकता.

सध्या शेअर मार्केटबद्दल माहित देणाऱ्या अनेक संस्था आणि अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ज्यात सरकारी व खासगी संस्थांचाही समावेश आहे.आम्ही इथे कोणत्याही संस्थेची एव्हाना आमच्या संस्थेचीही जाहिरात करू इच्छित नाही परंतु योग्य निवड करून योग्य तो अभ्यासक्रम निवडावा हि विनंती आणि आपल्या वाटचालीला सुरुवात करा. आमच्याकडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.

आम्हाला तुमच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा राहील आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आनंदच होईल. आमचे मार्गदर्शन तुमच्या पाठीशी नेहमीच आहे. तुम्ही आमच्याशी कधीही संपर्क करू शकता.

शेअर मार्केट व्यवसायामध्ये तुमचे हार्दिक स्वागत.

तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा, आणि जर खरंच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा .

धन्यवाद आणि गुंतवणुकीसाठी शुभेच्छा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *