यशस्वी भव

यशस्वी भव
"यशस्वी भव" काय आहे ह्या आशिर्वादामध्ये, काय आहे याचा अर्थ? हे आपण आज जाणून घेऊ आमच्या दृष्टिकोनातून. जेव्हा यशस्वी हा शब्द आपण मोठ्यांच्या आशिर्वादामध्ये ऐकतो, काय असेल ह्या मागचे कारण. तुम्हाला काय वाटते "यशस्वी" ह्या शब्दाचा अर्थ काय असेल तर ह्या शब्दाचा अर्थ हा वयोमानाप्रमाणे बदलतो पण सरतेशेवटी एकच आहे, ते आपण जाणून घेऊ.
“यशस्वी भव” काय आहे ह्या आशिर्वादामध्ये, काय आहे याचा अर्थ? हे आपण आज जाणून घेऊ आमच्या दृष्टिकोनातून.
जेव्हा यशस्वी हा शब्द आपण मोठ्यांच्या आशिर्वादामध्ये ऐकतो, काय असेल ह्या मागचे कारण. तुम्हाला काय वाटते “यशस्वी” ह्या शब्दाचा अर्थ काय असेल तर ह्या शब्दाचा अर्थ हा वयोमानाप्रमाणे बदलतो पण सरतेशेवटी एकच आहे, ते आपण जाणून घेऊ.
आपण टप्प्या-टप्प्याने यशस्वी ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. लहानपणी आई-वडील आपल्याला जेव्हा “यशस्वी हो” असं म्हणायचे तेव्हा अर्थ असा होता कि चांगले शिक्षण व संस्कार घेऊन पुढे जाणे, ह्या वळणावर यशस्वी होण्याचा अर्थ एवढाच असतो कि जेव्हा मुलं आपल्या पालकांच्या विश्वातून बाहेरच्या विश्वात प्रवेश करतात आणि शालेय शिक्षणाची सुरुवात करतात, त्यात यश मिळवतात. हे यश म्हणजे त्यांच्या पुढील आयुष्याची पायाभरणी असते, कारण ह्या शालेय जीवनात त्यांना शिक्षणाबरोबर बरेच काही शिकायला मिळते, ते म्हणजे वैयक्तिक विकास, कला क्षेत्र, सामान्य ज्ञान, शिष्टाचार, आणि सामाजिक ज्ञान व इतर बरेच काही. हे यश मिळविणे फार महत्वाचे आहे.
शालेय शिक्षण पूर्ण होताच वेध लागतात ते व्यावसायिक कारकीर्द निवडण्याचे. हे करण्यासाठी तुम्ही त्यादृष्टीने शिक्षण निवडता आणि पुढील कारकिर्दीकडे वाटचाल सुरु होते. इथे हि आपल्याला आपल्या आई-वडिलांकडून तसाच म्हणजे यशस्वी होण्याचा आशीर्वाद मिळतो. ह्या शिक्षणात मिळविलेले यश तुम्हाला तुमच्या कारकिर्दीला अनोखे वळण आणि यशाचे मार्ग खुले करून देते. ह्या यशानंतर तुमची आणखी एक महत्वाची कारकीर्द सुरु होते.
हि कारकीर्द आहे, वैवाहिक आयुष्याची सुरुवात. आणि इथेही तुम्हाला यशस्वी आयुष्याचा कानमंत्र वा आशीर्वादच मिळतो कारण तुम्हाला जबाबदारी पेलण्याचे मोठे आव्हान असते. हे आव्हान म्हणजे आपले आई-वडील, कुटुंबातले इतर सदस्य उदा. भाऊ-बहीण, आत्या, मावशी ई., नव्याने घरात आलेली पत्नी, आणि आपली मुले ह्यांचा सांभाळ करणं आणि आपल्या संसाराचा गाढा समर्थरीत्या चालविणे. ह्याचबरोबर आपले सामाजिक प्रत टिकवणे जी आपल्या वाड-वडिलांपासून चालत आली आहे. ह्या वळणावर यशस्वी होणे म्हणजे तारेवरची कसरत आणि इथे आतापर्यंत आपण मिळविलेल्या शिक्षण आणि आशीर्वादाचा उपयोग होतो.
इथे आपण ज्या यशाबद्दल बोललो त्यात कुठेही संपत्तीचा उल्लेख झालेला दिसत नाही ह्या गोष्टीचं नवल वाटले असेल बऱ्याच जणांना. यश म्हणजे मिळवलेली धन-संपत्ती, वैभव, घर-बांगला, गाडी, दाग-दागिने ई. असे बऱ्याच लोकांना वाटते आणि ते बऱ्याच अंशी बरोबरहि आहे ह्याला माझंहि दुमत नाही. पण यश आणि त्यामागून येणारं वैभव ह्याच नातं समजून घेऊ.
पैसे हे सगळेच कमावतात कुठल्या ना कुठल्या मार्गाने, कधी चांगल्या तर कधी वाईट. ह्या विषयावर जास्त बोलू इच्छित नाही पण सांगणं महत्वाचे होतं. सांगण्याचा तात्पर्य एवढाच कि आपले आई-वडील आपल्याला चांगले शिक्षण आणि संस्कार का देतात, तर आपण आयुष्यात आपल्या आवडीचे चांगले क्षेत्र निवडावे आणि सन्मानाने आयुष्य जगावे. चांगले शिक्षण आणि संस्कार एक चांगला माणूस घडवतो. इथे काही अपवाद आहेत कारण शिक्षणाविनाही केवळ आपल्या कला-गुणांच्या व चांगल्या संस्काराच्या जोरावर बहुतेकांनी आपली कारकीर्द घडवली आहे.
ह्या लेखाचा संक्षिप्तपणे उद्देश्य किंवा तात्पर्य नमूद करतो. यशस्वी होणे म्हणजे फक्त पैसे कमविणे नाही किंवा केवळ रग्गड पैसे मिळविण्यासाठी शिक्षण घेऊ नका. पैशामागे कधीही पळू नका. तर योग्य शिक्षण आणि संस्कार मिळवून एक चांगला माणूस बना, यशस्वी व्हा. आणि यशस्वी माणसाकडे लक्ष्मी आपोआप येते.
ह्या लेखाचा सार सर्वाना समजला असेल याची खात्री बाळगतो आणि जर हा लेख मनापासून आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत पोहोचावा ही विनंती.
धन्यवाद.