यशस्वी कसे व्हाल?

यशस्वी कसे व्हाल?
यशस्वी कसे व्हाल? तर प्रथम आपल्याकडे संयम असायला हवा, तो हया साठी की कुठल्या ही गोष्टीचे शास्त्रशुद्ध व संपूर्ण शिक्षण असणे फार महत्वाचे आहे. अपूर्ण शिक्षण व संयमाची कमतरता आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचू देणार नाही हे लक्षात ठेवा. इथे मी एक नमूद करू इच्छितो की हया ज्ञानाला शैक्षणिक अभ्यासाची जोड़ असणे ही तितकेच गरजेचे आहे.
मित्रांनो, आज तुमच्या समोर मांडणार विषय हा माझ्या मागचा लेख “यशस्वी भव” चा पुढचा प्रवास असा उल्लेख होऊ शकतो. मागच्या लेखात आपण यशस्वी हया शब्दाचा अर्थ समजून घेतला, आमच्या दुष्टीकोनातून व आम्हाला त्याचा चांगला प्रतिसादही मिळाला. यशस्वी म्हणजे काय व का व्हायचे हे आपण मागील लेखात वाचले तर हया लेखात आपण यशस्वी कसे व्हायचे हे पाहू.
जसं मागच्या भागात आपण पाहिले की यशस्वी हया शब्दाचा अर्थ आयुष्याच्या टप्प्या-टप्प्यावर बदलतो, पण यशस्वी होण्यासाठी करायचे प्रयत्न हे प्रत्येक टप्प्यावर सारखेच असतात असे मला वाटते, जे आपण थोडक्यात समजून घेऊ.
यशस्वी कसे व्हाल? तर प्रथम आपल्याकडे संयम असायला हवा, तो हया साठी की कुठल्या ही गोष्टीचे शास्त्रशुद्ध व संपूर्ण शिक्षण असणे फार महत्वाचे आहे. अपूर्ण शिक्षण व संयमाची कमतरता आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचू देणार नाही हे लक्षात ठेवा. इथे मी एक नमूद करू इच्छितो की हया ज्ञानाला शैक्षणिक अभ्यासाची जोड़ असणे ही तितकेच गरजेचे आहे.
शिक्षण झाले आता पुढे काय? “असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी” असं म्हणून चालणार नाही तर “प्रयत्नांती परमेश्वर” हे उपयोगी येणार व हया म्हणीचा अर्थच सर्व काही सांगून जातो. अर्थ असा की जर तुम्ही मनापासून प्रयत्न केला तर तुम्हाला परमेश्वर ही दिसेल आणि इथे परमेश्वर म्हणजेच यश असा आहे. प्रयत्नच झाला नाही तर शिक्षणाचा उपयोग तो काय आणि यश कसं मिळवाल? म्हणून प्रयत्न तर व्हायलाच हवे.
लेखाच्या अखेरीस अजून एक महत्वाचा मुद्दा वा गुण इथे नमूद करतो ज्यावर मतभेद नसावेत आणि जर असलेच तर ते संपवा, तरच यशस्वी व्हाल. इतरांच्या यशाकडे नुसतं पाहू नका वा हुरळून जाऊ नका, तर त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घ्या. इतरांच्या यशामध्ये अडथळा बनण्यापेक्षा त्यांच्यासारखं यश मिळवण्याचा प्रयत्न करा. अडथळा बनण्यात नुकसान तुमचंच आहे, कारण तुम्ही वाईट करण्यात वेळ वाया घालवणार आणि शेवटपर्यंत अयशस्वीच राहणार म्हणून सांगू इच्छितो की वेळेचा सदुपयोग करून यशस्वी व्हा.
एवढे मुद्दे सध्यातरी पुरेसे वाटतात पण जर काही नवीन सुचलंच तर हया लेखाला क्रमशः पुढे नेण्याचा प्रयत्न राहील. वरील नमूद मुद्दे हे केवळ वाचून नाही तर अंगीभूत कराल तरच यशस्वी व्हाल आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित होणार नाही. लेखाच्या शेवटी एवढंच सांगेन की यशस्वी असाल तर लक्ष्मीकृपा ही होणारच.
जर हा लेख मनापासून आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत पोहोचावा ही विनंती.
धन्यवाद.