Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

भारतात कोरोना झाला हतबल

भारतात कोरोना झाला हतबल

आपणा सर्वांना माहितच असेल कि कोरोना हा परदेशी पाहुणा आहे आणि आपल्याला ह्याला थांबवून घ्यायचे नाही तर त्याला परतवून लावायचे आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कोरोना का, कसा, कोणामुळे आणि कधी जाणार ह्याचा विचार करून आणि त्याच्या विषयी चर्चा करणे प्रथम थांबवा. हे काही राजकारण आहे का? ह्याबद्दल आपले विचार मांडणे थांबवा आणि त्याच्या पासून बचाव करण्याबाबत विचार करा. चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा कोरोना बद्दल जनजागृती करण्यावर भर द्या कारण आतापर्यंत कोरोनाबद्दल संपूर्ण माहिती उघड झाली आहे.आता तर सरकारनेही "आत्मनिर्भर" होण्यास सांगितले आहे कारण जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना वर औषध वा लस अजून उपलब्ध झालेली नाही, याचा अर्थ उघड आहे कि आपण कोरोनाला रोखणे म्हणजे त्याच्यापासून बचाव करणे इथपर्यंत मर्यादित नाही तर त्याचा प्रसार रोखणेही तेवढे महत्वाचे आहे.

कोरोना हा विषय आणि परिस्थिती दोन्ही गोष्टी गंभीर आहेत परंतु हे आपल्याला कधी कळणार हे या लेखामधून आम्हाला तुमच्या पुढे मांडायचे आहे.

आपणा सर्वांना माहितच असेल कि कोरोना हा परदेशी पाहुणा आहे आणि आपल्याला ह्याला थांबवून घ्यायचे नाही तर त्याला परतवून लावायचे आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कोरोना का, कसा, कोणामुळे आणि कधी जाणार ह्याचा विचार करून आणि त्याच्या विषयी चर्चा करणे प्रथम थांबवा. हे काही राजकारण आहे का? ह्याबद्दल आपले विचार मांडणे थांबवा आणि त्याच्या पासून बचाव करण्याबाबत विचार करा. चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा कोरोना बद्दल जनजागृती करण्यावर भर द्या कारण आतापर्यंत कोरोनाबद्दल संपूर्ण माहिती उघड झाली आहे.आता तर सरकारनेही “आत्मनिर्भर” होण्यास सांगितले आहे कारण जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना वर औषध वा लस अजून उपलब्ध झालेली नाही, याचा अर्थ उघड आहे कि आपण कोरोनाला रोखणे म्हणजे त्याच्यापासून बचाव करणे इथपर्यंत मर्यादित नाही तर त्याचा प्रसार रोखणेही तेवढे महत्वाचे आहे. हे कसे शक्य आहे हे आपण पुढे पाहूया.

कोरोना आपल्याकडे आला म्हणजे च भारतात आला आणि इतर देशांप्रमाणेच आपणही टाळेबंदीचा अवलंब केला कारण कोरोनावर औषध वा लस नसल्याने त्याचा प्रसार रोखणे हेच आपल्या हातात आहे. त्यात आपण बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झालो आहोत. आता आपल्या समोर लक्ष्य आहे ते म्हणजे त्याचा समूळ नायनाट करणे आणि हे आपल्याला जमेल का हा मोठा प्रश्न आहे जे ह्या लेखाचे मूळ उद्दिष्ट आहे आणि ते जर आपल्यापर्यंत पोहोचले तर आपण नक्की यशस्वी होऊ यात दुमत नसेल.

आपल्याला आठवते, जेव्हा मार्च अखेरीस आपल्या भारतात टाळेबंदी लागू झाली आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. हळूहळू ही टाळेबंदी वाढतच गेली ती जून पर्यंत वाढली, जुलै मध्ये पण करावी लागली तर काही ठिकाणी अजूनही चालूच आहे कारण कोरोना हा पाहुणा काही जायचे नावच घेत नाही. याचं महत्वाचे कारण शेवटी पाहूच. तर ह्या टाळेबंदीने आपली अर्थव्यवस्था कोलमडली, जनसामान्यांना खूप काही भोगावे लागले असताना काही गोष्टी चांगल्या ही घडल्या त्या म्हणजे पर्यावरणातले प्रदूषण कमी झाले, ध्वनी प्रदूषण कमी झाले, काहींना तर नाती उलगडू लागली, लोकांचे अनावश्यक खर्च कमी झाले, आणि सर्वात महत्वाचे लोकांना स्वचतेचे महत्व कळले, प्रसारमाध्यमांनी आपल्याला ह्या काळात हे सर्व दाखवून दिले आणि आपण ही त्याचा हेवा केला.पण जसे सरकारने टाळेबंदी शिथिल केली तसतसे हे चित्र बदलायला लागले. कोरोनाचा संसर्ग वाढला, पर्यावरण – ध्वनी प्रदूषण वाढलं, नियम धाब्यावर बसवले, आणि ज्याचं आपल्याला कौतुक वाटत होतं कि स्वच्छतेचे महत्व सर्वांना पटलेले आहे तेच विसरलो आणि पूर्वीसारखे वागायला लागलो त्यात सर्वात लाजिरवाणे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, येता जाता कुठेही थुंकणे वगैरे अन्य प्रकार सुरु झाले. म्हणजे आता कुठे आपल्याला वाटू लागले होते कि कोरोनाच्या येण्याने आपल्याला स्वचतेचे महत्व कळले आणि हे पुढे असच चालू राहील, पण असं काही होताना दिसत नाही आहे, ह्याचे वाईट वाटतं.

ही वरील परिस्थिती कोरोना एवढीच गंभीर आहे आणि हे आपणही राजरोसपणे घडताना पाहत आहोत तर काही जण सहभागीही असतील. ह्या लेखातून सांगायचं तात्पर्य एवढाच कि ज्या परदेशी पाहुण्याने आपल्याला स्वचतेचे महत्व पटवले जे आपल्या महान व्यक्तींनी ही आचरणात आणण्यासाठी धडपड केली त्याच स्वच्छतेमुळे आपण कोरोनाच काय कुठल्याही संसर्गजन्य रोगांना आपण दूर ठेवू शकतो. पण नाही आपण का असे करायचे, आपले घर ठेवू पण देश नाही. आपल्याला आपल्या कुटुंबाची काळजी आहे पण देशवासीयांची नाही असे का? लहानपणी प्रतिज्ञा सर्वानीच म्हंटली असेल कि सारे भारतीय आपले बंधू भगिनी आहेत मग त्यांची काळजी का नाही?

शेवटी एवढे सांगावेसे वाटतं कि जागे व्हा, स्वच्छतेचे नाही निदान प्रतिज्ञेत म्हंटल्याप्रमाणे सर्वांना बंधू भगिनी मानायला शिका म्हणजे स्वच्छता आपणच जपली जाईल.

जर मनापासून हा लेख आवडला असेल तर नक्कीच इतर लोकांपर्यंत पोहोचावा ही विनंती.

जर हा लेख मनापासून आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत पोहोचावा ही विनंती.

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *